Posts

Showing posts from 2015

रतनगड - सांधण Valley एक स्वप्नपुर्ती…

Image
रतनगड - सांधन Valley.. पावसाळा नुकताच संपला होता थोड़ी वेगळी आणि निवांत भटकंती करू असा विचार असताना सर्वानुमते रतनगड आणि सांधन valley करू असा शिक्कामोर्तब झाला  बरेच दिवस plan करुण शेवटी ठरलेल्या दिवशी आम्ही निघालो भोसरीतुन विशाल सावंत गाड़ी घेऊन शिवाजीनगर ला आला होता त्याच्या बरोबर रोहन भोसले आणि अभी कदम होते मी पोचलो आणि काही वेळात स्वप्निलदादा नवले हे रविदा कोल्हे यांच्या बरोबर आले आम्ही  आता वाट पाहत होतो ते मुंबईतील आमच्या मित्रांची थोड्या वेळात राहुल कराळे (RK)हे त्यांच्या नविन रथासोबत दाखल झाले RK हे मुंबईतील मित्रांना आणायला स्टेशन वर गेले थोड्या वेळात मुंबई चे मित्र आलेच आम्ही भेटी गाठी करुण गाड़ी रतनगड कड़े मार्गस्थ केली ओतुर फाटयावरुण आम्ही जाणार होतो आमचे guide श्री काळू बांडे हे आमची त्यांच्या बहिणीच्या म्हणजेच शेंडी या गावी वाट पाहत होते  आम्ही गाडी सुरु होताच आम्ही ओळख कार्यक्रम करुण घेतला आणि मग झाली  गाण्यांची मैफिल सुरु शेर शायरी ,कविता तर मधेच जूनी गाणी आम्ही ओतुर फाटा ओलांडला आणि मग gps ची मदत घेत रात्री 4 वाजता आम्ही शेंडी या गावी पोचलो त...