रतनगड - सांधण Valley एक स्वप्नपुर्ती…
रतनगड - सांधन Valley..
पावसाळा नुकताच संपला होता थोड़ी वेगळी आणि निवांत भटकंती करू असा विचार असताना सर्वानुमते रतनगड आणि सांधन valley करू असा शिक्कामोर्तब झाला बरेच दिवस plan करुण शेवटी ठरलेल्या दिवशी आम्ही निघालो भोसरीतुन विशाल सावंत गाड़ी घेऊन शिवाजीनगर ला आला होता त्याच्या बरोबर रोहन भोसले आणि अभी कदम होते मी पोचलो आणि काही वेळात स्वप्निलदादा नवले हे रविदा कोल्हे यांच्या बरोबर आले आम्ही आता वाट पाहत होतो ते मुंबईतील आमच्या मित्रांची थोड्या वेळात राहुल कराळे (RK)हे त्यांच्या नविन रथासोबत दाखल झाले RK हे मुंबईतील मित्रांना आणायला स्टेशन वर गेले थोड्या वेळात मुंबई चे मित्र आलेच आम्ही भेटी गाठी करुण गाड़ी रतनगड कड़े मार्गस्थ केली ओतुर फाटयावरुण आम्ही जाणार होतो आमचे guide श्री काळू बांडे हे आमची त्यांच्या बहिणीच्या म्हणजेच शेंडी या गावी वाट पाहत होते आम्ही गाडी सुरु होताच आम्ही ओळख कार्यक्रम करुण घेतला आणि मग झाली गाण्यांची मैफिल सुरु शेर शायरी ,कविता तर मधेच जूनी गाणी आम्ही ओतुर फाटा ओलांडला आणि मग gps ची मदत घेत रात्री 4 वाजता आम्ही शेंडी या गावी पोचलो तिथे राहण्याची सोय आमचे guide श्री बांडे यानी केली होतीच् लवकर झोपुन सकाळी उठून भरपेठ नाश्ता केला शेंडी हे गाव डोंगरामध्ये सुर्य डोक्यावर येतो तेवःच इथे सुर्य दिसतो आम्ही सर्व कार्यक्रम आटपून रतनगड पायथा म्हणजेच रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर गाठले तिथे आम्ही जीवंत पुष्करणी पाहिली पुष्करणी अजूनही चांगल्या स्थितीत आहे पुढे आम्ही सर्व मंडळी अमृतेश्वर मंदिरात गेलो अमृतेश्वर मंदिर हे हेमांडपंथी बांधकामाचा उत्तम नमूना होय महादेवाच दर्शन घेऊन आम्ही मंदिरातील शिल्पकला पाहण्यात दंग झालो आमचे रविदा शेड्गे आम्हाला शिल्पकला बद्दल माहिती देत होते शल्य एकाच गोष्टीच् होते ते म्हणजे इतके सुंदर शिल्पकला आहे मंदिर हे खुप पुरातण आहे पण गावातील लोकांनी मंदिराला Oil paint दिला आहे त्यामुळे मंदिराच्या शिल्पकलेला थोड़ी बाधा आली आहे तेवढ्यात रविदाना एक गद्देगळ हा वीरगळीचा प्रकार दिसला ते या प्रकारच्या वीरगळी शोधातच होते त्यानी या वीरगळ बद्दल सविस्तर माहिती दिली ही वीरगळ का असायची वगेरे आता. RK यांनी सर्वाना सुचना दिल्या आणि आम्ही रतनगड कड़े मार्गस्थ् झालो रतनगड हा खुप पुरातन किल्ला आहे अशी माहिती आमचे guide यानी दिली आम्ही अगदी शिस्तीने गड चढत होतो या चढणी मधे इतिहासाचा विषय आणि मागील ट्रेक चे अनुभव आम्ही सांगत होतोच पुढे गडाच्या मधे आम्ही थांबून थोड़ी विश्रांती आणि पोटपूजा करुण आम्ही निघालो रतनगडाच्या पायरया या नष्ट झाल्यामुळे तिथे 2 ठिकाणी लोखंडी शिडी लावलेली आहेत या शिड्या चढूंन आपण रतनगडाच्या द्वारात पोचतो दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीत आहे या दरवाज्यातून थोड़े पुढे जाऊंन आपण एका बुरुजा जवळ पोचतो त्या बुरुजावरुण थोड़े खाली चालत गेल्यास कात्राबाईचा नाव असलेला अखंड मोठी शीला असलेला कडा दिसतो या कड्याची भव्यता एवढी मोठी आहे की खाली पाहताच चक्कर येऊ शकते.पुढे आम्ही त्या कड़याच्या बाजूनेच जाऊ लागलो वाटेत 5 - 6 पाण्याची एकत्र असलेली टाके दिसले पाऊस नुकताच येऊन गेल्यामुळे पाणी पिण्यायोग्य नव्हते पण त्याच्या थोड़े भुयारात एक पाण्याच टाक होत तेथील पाणी अत्यंत शीतल आणि चविला गोड होते आता आम्ही रतनगडावरील नेढ (नैसर्गिक पद्धतीने बऱ्याच कालावधीत एखाद्या डोंगराला पडलेल एक मोठ भोक म्हणजेच नेढ होय) नेढ बराच मोठा होता त्यातून आसपासच परिसर आणि आम्ही कुठून आलो याची पायवात आमचे guide दाखवत होते मग आम्ही थोडा आराम करुण गड उतरायचे असे ठरले सोबत आणलेलं खाणं संपवुण आम्ही गडाचा महाद्वार अर्थात त्रंबक दरवाजा पाशी पोचलो महाद्वार हा अखंड प्रचंड अश्या दगडात कोरलेल आहे दरवाजा अत्यंत चांगल्या स्थितित उभा आहे थोड़े पुढे जाताच आम्हाला फुरश्या जातीचे 5 -6 साप तिथे आढळले हे साप अत्यंत विषारी असतात हे नंतर कळाले आम्ही अत्यंत तीव्र अश्या पायरया आणि तिथक्याच् घातक असलेला पायरया उतरन खाली आलो मागे पाहताच रतनगड एका रौद्र कडा भासत होता इतका तो विशाल पसरलात आम्ही सांधन valley पायथ्याच्या गावाकडे निघालो वाटेत काही trekker भेटले त्यांना थोडसा सांभाळून जा ऎसे सांगून आम्ही पुढे निघालो यावेळात सूर्य मावळत होताच सूर्यास्त कैमरा मधे टिपने मला खुप आवडत मी काही click टिपूण सुर्यास्ताला अलविदा केला आम्ही सांधन च्या पायथ्याच्या गावी पोचलो जेवण वगेरे कार्यक्रम उरकुन आम्ही मैफिली साठी आणि झोपन्याची तयारी करण्यासाठी एका मोकळ्या जागी tent लावले ज्या पठारावर tent लावले होते tent लावून शेकोटी पेटवली तशी ठंडी ही खुप होती तिथे मग सुरु झाल्या मैफिली , आणि मागील ट्रेक चे अनुभव सांगणे आणि उद्याची तयारी याबाबतीत आमचे लीडर राहुल कराळे आणि रविंद्र शेडगे यानी सूचना दिल्या त्या चांदण्या रात्री चांदण्याची जणू बरसात झालीच होती त्या छत्रछाया खाली बसलेलो आम्ही ,शेजारी लावलेले tent आणि जमलेली मैफिल, सुखाची व्याख्या हीच का ? असा प्रश्न पडला नाही तर नवलच,
ज्या जागी camp, tent लावले होते त्याच्या आजू बाजुला किल्ले रतनगड,किल्ले आजोबा , किल्ले AMK ची रांग आणि कळसुबाई चा शिखर अशी भटकंती ला आव्हान देणारी ठिकाण, शेकोटीची उब घेउन tent मधे मारलेली सुम्म पडी.. सकाळी 4.30 ला उठायच अस दिलेल आश्वासन आणि ते सगळ्यानी पालन केल
दूसरा एक group आपल्या अगोदर जाऊ नये या साठी केलेली धडपड चालू होती सांधन valley कड़े आम्ही मार्गास्त झालो ट्रेक ची सुरुवात झाली आणि दर्शन दिल ते म्हणजे हरणटोळ नावाच्या सापाने आम्ही valley च्या सुरुवातीला पोचताच नारळ फोडून छ शिवरायांचा जय जयकार करत आम्ही दरी पार करू लागलो दरीची भव्यता डोळे दिपवुन ताकत होती सगल्यांची स्वप्नपूर्ती झाली होती ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतीच् थोड पुढे गेलोच तोच छाती एवध पानी सकाळ च्या थंडीत हाडे गोठवनार पाणी सुरुवात झकास झाली या पाण्यात पण selfie काढण्याचा मोह आवरता आल नाहि सुरुवात तर दमदार झालीच होती वरुण जॉइन्ट स्विंग हा साहसी खेळाचा प्रकार चालला होता सांधन valley नावातली ही गूढता वाढत चालली होती भली मोठी दरी आणि त्यात आपण वाटनारे सूश्म प्राणी आम्ही संथ गतीने पुढे जात होतो उत्सुकता होती ती valley rapppeling ची एकदाचे आम्ही तिथे पोचलो आणि आपला क्रमांक कधी लागतो याची वाट पाहत होतो. मला Group चे Rappeling चे फोटो काढणे हे सांगितले होते त्याप्रमाणे मी एका टोकाला बसुन click घेत होतो rappelling ची सर्व तयारी झाली होती आमचा पहिला superman उतरला तो म्हणजे विदेश मग एकामागे एक असे आम्ही सर्व खाली उतरत होतो सर्व जण उतरून आम्ही पुढे निघालो valley ची भव्यता डोळ्यात भरत नव्हतीच जो तो valley च्या प्रेमात होते valley crossing पूर्ण झाली मग आम्ही मोर्चा वळवला तो पोहण्यासाठी पाण्यात मनसोक्त खेळून आम्ही आम्ही करोली घाटामार्गे परत पायथ्याच्या गावी पोचलो जेवण करुण आम्ही परतीच्या मार्गी लागलो….
रतनगड - सांधण Valley एक स्वप्नपुर्ती…
निघताना ट्रेक च्या सुखद आठवणी घेऊन आम्ही मार्गस्त झालो..
-समाप्त
अमित कोदेरे | रतनगड - सांधन valley | 2014
सौजन्य - ऐकत नाय मित्र मंडळ
निघताना ट्रेक च्या सुखद आठवणी घेऊन आम्ही मार्गस्त झालो..
-समाप्त
अमित कोदेरे | रतनगड - सांधन valley | 2014
सौजन्य - ऐकत नाय मित्र मंडळ
अमित.....मस्ताड रे....मी ही अनुभव घेतला वाचून ....भन्नाट अनुभव.....!!! मस्त लिहितोस रे.....!!!
ReplyDeletedhanyawad tumhi vacahalat khup aanand jhala mala tumha sarvankadun shiktoy me matra..
Delete