Posts

Showing posts from June, 2018

Trek to Songiri Fort

Image
किल्ले सोनगिरी ...  अप्पा ने  जेव्हा  किल्ले सोंडई चा ट्रेक तयार केला तो पर्यंत किल्ले सोंडई आणि किल्ले सोनगिरी या किल्ल्या बाबत काहीच माहिती नव्हती . एफबी  वरून जेव्हा हा ट्रेक  टाकण्यात आला होता त्यावेळी खूप मुलांनी गोइंग म्हंटले होते ,  त्यामुळे मनामध्ये बरयाच लोकांबरोबर हा ट्रेक करता येईल असं वाटलं होतं , पण प्रत्यक्षात शिवाजी नगर स्थानकावर सकाळी ५. ३० आल्यावर मी धरून ४ ट्रेकर आले होते व २ ट्रेकर मुंबईहून निघाले होते ते आम्हाला कर्जत स्थानकावर  येउन मिळणार होते . आम्ही ट्रेन ने  सुरूवात केली ट्रेन मधून लोणावळा , खोपोली , या परिसराच सौंदर्य पाहून मन उत्साहित झाले होते , त्यात नीला शुभ्र आकाश दिसत होता पावसाचा  लवशेश  हि नव्हता , त्यामुळे  मनात खूप फोटो काढू हे ठरवूनच टाकला होता , रेल्वे प्रवासात ओळखी व अनुभव सांगण्यात सुरवात झाली त्यामुळे स्टेशन ला केव्हा पोचलो हे लक्षात आलच नाही. आम्ही कर्जत स्थानका वर उतरून मुंबई हून येणाऱ्या मित्राची वाट पाहत होतो , ते येउन मिळाले मग आम्ही किल्ले सोन्ड्यी कडे मार्गस्त झालो नष्ट उरकून आम्ही किल्ल्याकडे निघालो , कर्जत बाजारात आल्यावर सोन्ड्यी कडे