Trek to Songiri Fort

किल्ले सोनगिरी ... 

अप्पा ने  जेव्हा  किल्ले सोंडई चा ट्रेक तयार केला तो पर्यंत किल्ले सोंडई आणि किल्ले सोनगिरी या किल्ल्या बाबत काहीच माहिती नव्हती . एफबी  वरून जेव्हा हा ट्रेक  टाकण्यात आला होता त्यावेळी खूप मुलांनी गोइंग म्हंटले होते ,  त्यामुळे मनामध्ये बरयाच लोकांबरोबर हा ट्रेक करता येईल असं वाटलं होतं , पण प्रत्यक्षात शिवाजी नगर स्थानकावर सकाळी ५. ३० आल्यावर मी धरून ४ ट्रेकर आले होते व २ ट्रेकर मुंबईहून निघाले होते ते आम्हाला कर्जत स्थानकावर  येउन मिळणार होते . आम्ही ट्रेन ने  सुरूवात केली ट्रेन मधून लोणावळा , खोपोली , या परिसराच सौंदर्य पाहून मन उत्साहित झाले होते , त्यात नीला शुभ्र आकाश दिसत होता पावसाचा  लवशेश  हि नव्हता , त्यामुळे  मनात खूप फोटो काढू हे ठरवूनच टाकला होता , रेल्वे प्रवासात ओळखी व अनुभव सांगण्यात सुरवात झाली त्यामुळे स्टेशन ला केव्हा पोचलो हे लक्षात आलच नाही. आम्ही कर्जत स्थानका वर उतरून मुंबई हून येणाऱ्या मित्राची वाट पाहत होतो , ते येउन मिळाले मग आम्ही किल्ले सोन्ड्यी कडे मार्गस्त झालो नष्ट उरकून आम्ही किल्ल्याकडे निघालो , कर्जत बाजारात आल्यावर सोन्ड्यी कडे जाण्याऱ्या वाहनाची  पण तेथील स्थानिक रिक्षावाले , जीप येण्यास तयार नव्हते , त्यांची मिनावणी करून सुद्धा ते तयार होत नव्हते वाहना शिवाय न जाने म्हणजे खूप वेळ जाणारा होता त्यामुळे आम्ही ट्रेक चा प्लान बदलायचं ठरवलं जवळच्या कोणत्या किल्ल्यावर जायचे हे ठरवत होतोच मग किल्ले सोनगिरी वर जायचे ठरले मग २ रेल्वे स्थानक मागे येउन रेल्वे रूळ ओलांडून डाव्या हाताने सोनगिरी वर निघालो 

 

कर्जत जवळील पलासधारी  स्टेशन पासून  या किल्ल्यावर जाण्यास रस्ता आहे. रस्ता   थोड सोपा तर काही ठिकाणी थोडा निसरडा आहे पावसाळात  काळजी घ्यावी . आपण गड चढण्यास सुरुवात रेल्वे चे रुळ ओलांडून डाव्या हाताने तर थोड्या वर गेल्यावर  उजव्या हाताने सुरुवात  करावी  रेल्वे च महामार्ग  आपण रस्ता सोडला नसल्याची याची आठवण करून देत राहतो  थोड वर गेल्यावर त्या  पाण्याचे छोटे झरे दिसतील . गडाला फारसा  मोठा  इतिहास नाही आहे आणि  गडाचा माथा हाहि  खूप छोटा असल्या कारणाने गड फिरण्यास  थोडासाच वेळ लागतो . हा  किल्ला नसून आसपासचा परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला बुरुज असावा असे याच्या अवशेषावरून  वाटतो गडावर कोठेही अवशेष  नाही  गडावर फार अवशेष नसले तरी काही प्रमाणात म्हणजे १ पाण्याच टाक आहे , गडावरून  आपणास  इरशाळगड , माथेरानच परिसर मन टाकतो  आणि इथे  तुम्हाला फोटो काढण्याच होणार मोह नाही अस होणारच नाही  , इथे फोटो काढण्याची अति  घाईच झाली होती वरील  परिसर मन मोहरून टाकतो   फोटो काढण्याची हौस भागवून गडावर पोहचलो असता वरील माथा फिरून तिथे १ ग्रुप फोटो कडून काढला त्यामागेही गम्मत होतो कॅमेरा ठेवण्यास जागा नव्हती आमच्या ब्याग वर ब्याग थुन फोटो काढला  मग आम्ही वळलो  पोटपूजा करण्यासाठी  सगळ्यांनी घरातून आणलेले डब्बे , सॉस काही वेगळे पदार्थ पोट्पुजे  साठी होतेच पोटपूजा उरकून आम्ही परतीचा मार्गाला दुसरया मार्गाने निघालो येताना वाटेत बाकी लोकांना मार्ग कळावा  म्हणून झाडावर खुणा करण्याचे काम विनायक सर आणि तेजस करत होतेच तिथून थोडे निसरड्या वाटेतून आम्ही मार्ग काढत होतोच हे काम  सर करतच होते . गडावर पाण्याची व जेवणाची सोय नाही पलासधारी स्थानक वरुन सोय होते , स्टेशन वर येताच ट्रेक ची सांगता झाली व सगळे परत निघालो पण ट्रेन उशिरा  येणार कळल्यावर आपण नष्ट आणि बाजारात  आलो ,  बाजारात फेरफटका मारत होतोच ( ट्रेन उशिरा येणार होती ) नंतर बाकी मंडळी  मुंबई तर आम्ही पुण्याच्या दिशेने  निघालो. पण मनामध्ये एक भन्नाट , अनवट ट्रेक केल्याचा आनंद होता घरी आल्यावर वर सुद्धा सोनगिरी आणि त्याची ट्रेक ची मज्जा अनुभव होतो ( मनामध्ये) ,

जाण्याच्या वाट :- पुणे रेल्वे स्थानका पासून २०० किमी वर पुणे -खोपोली - पलासधारी स्थानक .

जाण्यासाठी लागणारा वेळ ३-४ तास , रेल्वे ने किव्हा  स्वताच  वाहन असेल तर एक दिवसात मस्त ट्रेक होऊ शकतो  . 

अमित कोदेरे.

Cont .

Mobile - 9604266735

E-mail - amitnkodere@gmail.com

Monsoon | August | 2013

Comments

Popular posts from this blog

वारी सोहळा - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

Camping & trek to Ghanagad Fort...

रतनगड - सांधण Valley एक स्वप्नपुर्ती…