Trek to Songiri Fort
किल्ले सोनगिरी ... अप्पा ने जेव्हा किल्ले सोंडई चा ट्रेक तयार केला तो पर्यंत किल्ले सोंडई आणि किल्ले सोनगिरी या किल्ल्या बाबत काहीच माहिती नव्हती . एफबी वरून जेव्हा हा ट्रेक टाकण्यात आला होता त्यावेळी खूप मुलांनी गोइंग म्हंटले होते , त्यामुळे मनामध्ये बरयाच लोकांबरोबर हा ट्रेक करता येईल असं वाटलं होतं , पण प्रत्यक्षात शिवाजी नगर स्थानकावर सकाळी ५. ३० आल्यावर मी धरून ४ ट्रेकर आले होते व २ ट्रेकर मुंबईहून निघाले होते ते आम्हाला कर्जत स्थानकावर येउन मिळणार होते . आम्ही ट्रेन ने सुरूवात केली ट्रेन मधून लोणावळा , खोपोली , या परिसराच सौंदर्य पाहून मन उत्साहित झाले होते , त्यात नीला शुभ्र आकाश दिसत होता पावसाचा लवशेश हि नव्हता , त्यामुळे मनात खूप फोटो काढू हे ठरवूनच टाकला होता , रेल्वे प्रवासात ओळखी व अनुभव सांगण्यात सुरवात झाली त्यामुळे स्टेशन ला केव्हा पोचलो हे लक्षात आलच नाही. आम्ही कर्जत स्थानका वर उतरून मुंबई हून येणाऱ्या मित्राची वाट पाहत होतो , ते येउन मिळाले मग आम्ही किल्ले सोन्ड्...