Camping & trek to Ghanagad Fort...


Camping & trek to Ghanagad Fort...

 
आदल्या दिवशी साने चा घनगड ट्रेक साठी कॉल आला आणि मी औपचारिकता म्हणून येतो बोलून निरोप घेतला. अगदी ट्रेक च्या मीटिंग पॉईंट पर्यंत जाऊ का नको अश्या द्विधा मनस्थितीत मी होतो इकडे whatsapp  ग्रुप ला ट्रेक च नियोजन आणि खलबत रंगले होते पण शेवटी अंगातल्या आळसावर मात करून bike ला self देऊन निघालोच काही मित्र कार (परी ) ने निघाले होते तर काही NDA गेट ला माझी वाट बघत थाबंले होते. ते पुढे जाऊन भूगाव ला थांबतो बोलले आणि मी तिथे पर्यंत  यावे असं ठरले.  एकदाचे आम्ही भेटलो आणि मग सुसाट सुटलो अगदी मायकल शूमाकर ला हि लाजवेल इतकी सुसाट BIKE  भाग्येश चालवत होता पुढे असच चालवून आम्ही आमचं मीटिंग  पॉईंट अर्थात आमची बाकीचे मित्र पौड च्या पुढे थांबले होते.

Meeting point


तिथे थोडा पोटोबा करून आम्ही परत सुसाट निघालो कार (परी) चा थांबा अविनाश कडे होताच तर आमचा मायकल शूमाकर अर्थात भाग्येश त्याच्या BIKE चा ताबा घेऊन होता. मी कंटाळा आला म्हणून कार मध्ये जाऊन बसलो आणि गौरीला (कार मालक ) कार बाहेरचा रस्ता दाखवला आता आमच्या ताफ्यात एक कार आणि तीन BIKE होत्या अवि चालक असल्यामुळे आम्ही सुसाट सुटलो होतो. पण थोड्या वेळाने आमचे सहकारी आणि आमचा मायकल शूमाकर काही दिसेना म्हणून अविने कार सावकाश घेतली पण तरीही आमची BIKE वर असणारी मंडळी काही पुढेच येईनात इथे कार मध्ये बसून माझी आणि परीक्षित ची बैचेनी जास्त वाढू लागली होती. शेवटी कार बाजूला घेऊन बंद केली आणि बाकीच्या मित्रांची वाट पाहिली. 

मजल - दरमजल करत आमचे सहकारी पोचले आणि त्याच्या मागे आमचे शूमाकर सुद्धा येऊन पोचले आता घनगड पायथ्याला लवकर पोचणे गरजेचे होते म्हणून BIKE चा ताबा मी आणि परीक्षित ने घायचा ठरल. आमच्या शूमाकर ला कार मध्ये बसवून आम्ही अगदीच सुसाट निघालो परीक्षित तर मायकल शूमाकर पेक्षा हि सुसाट होता. आणि शेवट पर्यंत तोच आघाडीवर होता रस्तात गप्पा मारत - मारत आम्ही घनगड पायथ्याला म्हणजेच "एकोले" गावी पोचलो जास्त वेळ न घेता आम्ही अगोदर सर्व साहित्य बाहेर काढले. झोपायची जागा आणि स्वयंपाकाची जागा अगोदर पक्की करून मी आणि अमित (अध्यक्ष ) गावातल्या एका घरात जाऊन सकाळच्या चहा - नाश्ताची व्यवस्था लावून आलो. 

आता आम्ही मोर्चा वळवला आम्ही रात्रीच्या जेवणा कडे आमच्या सर्वांचे आम्ही  दोन गट पाडले एका गटाने चूल मांडणे आणि त्या संबंधित कामे करणे तर दुसऱ्या गटाने आणलेल्या भाज्या कापून कच्च साहित्य तयार करणे आमचा वेटलिफ़्टर सुस्मित आणि मी मोठ्या दगडांची चूल मांडली तर गौरीने चिकन बार्बेक्यू साठी लागणारी तयारी केली आजचे मास्तर शेफ अवि ,परीक्षित आणि अध्यक्ष अमित होते त्यामुळे बाकीच्यांना काळजीच काही कारण नव्हतंच.

परीक्षित ने छान व्हेज बिर्याणी साठी फोडणी दिली आणि सुरुवात झाली व्हेज बिर्याणी लवकर तयार होणार होती आणि ती लवकर तयार सुद्धा झाली होती.  आता मोठी परीक्षा हि बार्बेक्यू ची होती हि लीलया गौरी ने पेलली अवि ने याला फुंकर मारून साथ दिली काही वेळात हे पण तयार झाली यावेळात परीक्षित ने फोटोग्राफी च स्किल दाखवून काही क्लीक घेतले आता पंगत पडली ती थेट

Barbeque at base village... 


गावाच्या रहदारीच्या रस्त्यावर कारण काय तर जेवताना लाईट हवी बार्बेक्यू आणि व्हेज बिर्याणी वर पोरांनी आडवा हात मारून आधी पोटोबा शमवला.  जेवणं आटोपली होती.  

जेवणाची पंगत - भटकंती वेडे


काहींची आता हे सर्व उरकता उरकता मध्यरात्र उलटली होती काहींनी झोपेचं कारण देत सरळ सरळ झोपी गेले बाकी राहिले ते उत्सुकता होती ती milkyway अर्थात आकाशगंगा पाहण्याची अखेर भर रस्त्यात आम्ही आमचा कॅमेरा सेटअप लावला बाजूला थंडीने कुडकुडणारे मित्र आणि आम्ही हौशी फोटोग्राफर अखेर ती दुधाळ चांदण्यांचा पुंजका असणारी :आकाशगंगा" आम्हाला दिसलीच बरेच जण हि 'आकाशगंगा' पाहणारे नवीन होते तर कॅमेरात ती टिपण्याचा कार्यक्रम आम्ही पहाटे ३.३० पर्यंत अविरत चालू ठेवला होता.
Milky way - आकाशगंगा



सर्व जण झोपी गेले पण पहाटे पर्यंत नितीश ,परीक्षित आणि मी जागे होतो "चांदण्यांची बरसात" पाहत नवीन कल्पना रंगवत होतो तेवढयात आम्ही भानावर आलो कि आपल्याला सकाळी पहाटे  ५ वाजता ट्रेक ला सुरुवात करायची आहे वाढत्या उन्हात किल्ला सर करणे अवघड जाईल याच हिशोबाने. पहाटे ५ वाजले रात्रभर न झोपलेले नितीश आणि परीक्षित यांनी सर्वाना उठवायची जबाबदारी घेतली. मी आणि अध्यक्ष अमित न उठण्याच्या तयारीत होतो पण आळसावर मात करीत किल्लावरून सूर्योदय न पाहणे हे जरा मनाला पटणार  नव्हतं. सर्व कार्यक्रम आटोपून आम्ही पहाटे ५ वाजताच घनगड ट्रेक ला सुरुवात केली अमित भालेकर यांच्या लीडरशिप खाली हे सर्व चालले होते. 
सूर्योदय


किल्ल्यावर जाण्यासाठी गावावातूनच वाट आहे शिवाजी ट्रेल संस्थेने रस्त्याच्या सुरुवातीपासून बोर्ड लावलेला आहे तिथून तुम्ही गड नजरेच्या टप्यात  ५ मिनिटात पोचता येईल किल्ल्यावर जाताना गडद झाडी आहे किल्ला अगदी ३० मिनिटात वर जाता येते १० मिनिटे सरळ चालल्यावर तुम्हाला जुन्या काही तुटलेल्या आणि झिझलेल्या पायऱ्या दिसतात पुढे तुम्ही गेल्यास एक भगवान शंकराचं मंदिराचे अवशेष आहे त्याचसोबत पिंड  एक नंदी, आणि २ वीरगळ हेही पाहायला मिळतात या मंदिराचे अवशेष पाहून आम्ही परत मागे येऊन वर चढलो तिथे गारजाई देवीच मंदिर आहे.
Team - भटकंती वेडे



या मंदिरावर एक जुना शिलालेख लिहिलेला आहे मंदिराच्या समोर एक मोठी दीपमाळ आहे आणि त्याच्या सेहजारी काही वीरगळ पडलेले आहेत.गारजाई मंदिरातून पुढे चालून गेल्यास आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारात येऊन पोचतो त्या मंदिरासमोर एक छोटीखानी गुहा कोरलेली आहे. आणि या गुहेत ५ लोकांना दाटीवाटीने राहता येईल अशी सोय आहे त्याच्या उजव्या हाताला पाहिल्यास एक मोठा कत्तली दगड पडला आहे आणि त्याच्या थोडे पुढेच गेल्यास कोपऱ्यात एक छोटी गुहा आहे हे सर्व पाहून आम्ही थोडे  तिथे  काहीं पायऱ्या सुरुंग लावून फोडलेल्या दिसून येतात आता शिवाजी ट्रेल अंडी इतर संस्थेनी तिथे १० फूट वगैरे लोखंडी पक्की शिडी लावली आहे जेणे करून आपल्याला तिथे पोचहने सोप्प होईल शिडीच्या टोकालाच एक गोड्या पाण्याचे पिण्याचं टाकं आहे हेच एकमेव गडावरील पिण्याचं पाणी आहे याच्या पुढे आपल्याला ८-१० पायऱ्या लागतात या चालून गेलात कि डावीकडे अगदी छोटी गुहा लागते येथून १० -१५ पायर्‍या चढून गेल्यावर आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश करतो.
घनगडावरून दिसणारा बुरुज आणि खिंड



मग आपण गडाच्या सर्वोच्च उंचीवर येतो इथून डावीकडे पाहिलं तर मोठीखिंड  दिसते गडाच्या उजव्या बाजूकडे एपहिल्यास एक बुरुज आणि एक स्वराज्याचं प्रतीक भगवा झेंडा रोवलेला आहे त्या बुरुजावर तोफेची सोया केलेली आहे किल्य्यावर काही जोते काही वाडे अवशेष दिसते गडमाथा अगदी छोटा आहे माथ्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो.
घनगडावरून डावीकडून दिसणारा सुधागड आणि

उजवीकडून ज्या उभ्या कातळी भिंती म्हणजेच तैल- बैला...

तसेच नाणदांड घाट, सवाष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा दिसतात या किल्ल्यावर "शिवाजी ट्रेल" व इतर या संस्थानी अवघड ठिकाणी शिडी व लोखंडाच्या तारा बसवलेल्या आहेत. तसेच किल्ल्याची डागडुजी करून माहीती फलक लावलेले आहेत. किल्यावरील सर्व गोष्टी अध्यक्ष अमित भालेकर समजावून सांगत होता. किल्ल्यावर थोडा वेळ घालवून आम्ही गाद उतरायला सुरुवात केली वाटेत आम्हाला काही आंबा झाडे  व करवंकंदांची जाळी दिसली हा रानमेवा खात-  खात आम्ही गड  उतरलो थेट अकोले गावात येऊन नाश्त्याच्या कार्यक्रम मित्रांनी उरकला आणि या सर्व गोड आठवणी घेऊन आम्ही पुन्हा शहरातल्या गोंगाटात परत यायला निघालो..
रानमेवा - करवंद


एक भन्नाट BIKE RIDE , सुंदर कॅम्पिंग , ताजेतवान करणारा ट्रेक असं थोडं वेळ काढलं तर आपल्याला करता येईल.. याच्यापुढे मला एकचं म्हणता येईल, 

"सह्यगिरीत रे झालो यार आपण 
म्हणू नका अलविदा आता दोस्त हो,

सह्याद्री सारीखा अमर आपला सलोखा,
राखून ठेऊ घरोबा असा दोस्त हो!"


पोहोचण्याच्या वाटा -
१. पुणे - भोर-मुळशी-भाबुर्डे -एकोले (पायथ्याचं गाव ) एकूण अंतर ९५ किमी आहे किंव्हा खाजगी वहानाने घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या एकोले गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे ऍम्बी व्हॅलीच्या दिशेने जावे. लोणावळ्यापासून २० किमीवर असलेल्या पेठशहापूर गावातून (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) उजव्या बाजूचा फाटा भांबुर्डे गावाकडे जातो. येथून खडबडीत डांबरी रस्ता १२ किमीवरील भांबुर्डे गावात जातो. भांबुर्डे गावात मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा रस्ता पकडावा, हा रस्ता ३ किमीवरील एकोले गावात जातो.


मुक्कामाची सोय -
१. एकोले गावात हनुमान मंदिरात सदरं १५ - २० लोकांची सोया होते.
२. किल्ल्यावर गुहेत ४-५ जणांची
३. गारजाई देवी मंदिरात १० लोकांची राहण्याची सोय होते.


-समाप्त
-Amit Kodere । Ghanagad Fort । May  2018


Facebook Link -

https://www.facebook.com/Amitkodere

Comments

  1. Sundar Amya... Keep blogging

    ReplyDelete
  2. Good ....... Thanks Amit for taking ur friends on Ghangad Fort ......Milind Kshirsagar

    ReplyDelete
    Replies
    1. thank you sanga milind kakala , agadi bhari kaam kelay kaka gadwar tumhi amhi he kititari varsh pahtoyy , apan ekada punyat event bhetalo hoto tevha bolna jhala hota yababatit

      Delete
  3. Mast lihilay in detail.. Ghangad la jaun alyasarkh watla.. :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वारी सोहळा - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

रतनगड - सांधण Valley एक स्वप्नपुर्ती…