वारी सोहळा - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले
आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले
तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे
पांडुरंगा आम्हांला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे..

या ओळी वाचल्या कि वारी सोहळ्याशी असणार भावनिक नातं सांगून जातं...

शाळेत असताना वारी मुळे २-३ दिवस सुट्टी मिळायाची तेवढीच काय ती वारीची ओळख , घराजवळ  २ दिवस चालणारे भजन, माउलींचा नामघोष परिसर उजळुन टाकायचे, कॉलेज ला असताना वारी जवळून पहायाचा योग जुळून आला तेव्हा काय तर मनात म्हणायचो काय हे वारकरी पोटापाण्याचा काम - धंदे सोडून वारी ला का? जातात, पुढे जाऊन वारीचा हा अनुभव स्वतः घ्यावा म्हणून ६-७ वर्षांपूर्वी पहिल्याचं वारीला गेलो होतो पहिला टप्पा होता पुणे-ते दिवेघाट तेव्हा ना मोबाइल होता ना कॅमेरा त्यामुळे ती पाहिलेली आणि अनुभवलेली वारी फक्त डोळ्यात साठवून बरेच अनुभव गाठीशी घेऊन ओल्या डोळ्यांनी घरचा रस्ता गाठला.



तो दरवर्षी जमेल तितकी वारी करेल. त्याच्या नंतरच्या वर्षी मित्राच्या कृपेने ५००D आणि मागचं ब्लर करणारी लेन्स घेऊन वारीचा रस्ता पकडला. गाडी वगैरे पार्क करून त्या वैष्णवांच्या मेळ्यांत शिरलो समोर रंगबेरंगी लुगडी - साडी परिधान केलेल्या काकी, मामी, आजी तर, पांढरे शुभ्र सदरे चढवलेली आजोबा, काका, मामा, दादा एक वेगळ्याच रंगात होते इथे प्रत्येक जण माऊली, इथे प्रत्येकाचं नाव पण माऊली इथे ना कोणी मोठा ना थोर ना कोणी लहान ना काही वयाची ९० गाठलेली तरुणांपासून ते ५-१० वर्ष नुकतेच वारी करणारे सर्व जण माऊलीच.









या दिवशी दिवेघाटाच सौंदर्य काही औरच असत रंगबेरंबुजून गी, केशरी फेटे, पांढरे शुभ्र सदरे, आणि भागवत धर्माचं प्रतीक म्हणजेच केशरी ध्वज, लाजून असणाऱ्या मावश्या, आज्या पाहिलं कि त्यांचे नकळत फोटो काढायचा मोह आपल्याला आवरला नाही तर तो फोटोग्राफर कसला, काढलेले फोटो पाहून लाजून बुजून फिदीफिदी हसणाऱ्या आज्या पाहिल्या कि तुमचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यांना त्यांचेच फोटो पाहताना कमालीचा आंनद होतो. 





एखाद्यावेळी अजून हौस म्हणून डोक्यावरचा पदर सावरत पुण्यांदा फोटो घेण्यात याची भारी चढाओढ असते  ९०दी पार केलेले तरुण काय त्यांचा उत्साह ! कोणावर अवलंबून न राहता अविरत ग्यानबा - माऊलींचा नामघोष करून मार्गक्रमण करणारे आजोबा हे आपल्याला हि लाजवतील. दिवेघाटात ठाण मांडून बसलेले वारकरी, भक्त फक्त माउलीच्या पालखीची आतुरतेने वाट बघत असतात.



एकदा का पालखी घाटात आली अंगावरून सरसरून येणारा काटा तुम्हाला कोणत्याही प्रसंग विसरायला भाग पाडू शकतो अस वातावरण माऊली माऊलीच्या या नामघोषात घाटात तयार झालेलं असतं. वारी असंख्य भक्तांना आशीर्वाद देऊन घाटाचा अवघड टप्पा पुर्ण करत पुढच्या मुक्कामी निघते.





 जेजुरी जवळ मल्हारी मार्तंड आणि कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांची भेट भंडारा उधळून साजरी होते, चांदोबाचा लिंब इथे होणारे पहिले उभे रिंगण ते इंदापुरात होणारे भव्य गोल रिंगण अक्षरशः भुरळ पाडते. गोल रिंगणात अश्व जेव्हा धावतात तेव्हा त्यांच्या पावलांची उडणारी धूळ मस्तकी लावण्यात वारकरी धन्यता मानतात. वयाचा ओझं न ठेवता धावणारे विणेकरी, पदर डोक्यावर तुळशी वृंदावन सावरून एका लयीत धावणाऱ्या महिला वारकरी पाहिल्या कि वारीच महत्व समजते. 






वाखरीला होणारे दोन्ही पालखीचे मिलन पुढे दोन्ही पालख्या एकत्र विठ्ठल - रखुमाई भेटीला पंढपूरकडे प्रस्थान करतात.




वारीची खासियत म्हणजेच शिस्त, आपलेपणा, साधी राहणी, मदतीचा हात हे शिकवण आणि या महाराष्ट्राला मिळालेली देणगी अर्थात वारी होय..



Amit N Kodere
amitnkodere@gmail.com
9604266735


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Camping & trek to Ghanagad Fort...

रतनगड - सांधण Valley एक स्वप्नपुर्ती…