Posts

वारी सोहळा - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

Image
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे पांडुरंगा आम्हांला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे.. या ओळी वाचल्या कि वारी सोहळ्याशी असणार भावनिक नातं सांगून जातं... शाळेत असताना वारी मुळे २-३ दिवस सुट्टी मिळायाची तेवढीच काय ती वारीची ओळख , घराजवळ  २ दिवस चालणारे भजन, माउलींचा नामघोष परिसर उजळुन टाकायचे, कॉलेज ला असताना वारी जवळून पहायाचा योग जुळून आला तेव्हा काय तर मनात म्हणायचो काय हे वारकरी पोटापाण्याचा काम - धंदे सोडून वारी ला का? जातात, पुढे जाऊन वारीचा हा अनुभव स्वतः घ्यावा म्हणून ६-७ वर्षांपूर्वी पहिल्याचं वारीला गेलो होतो पहिला टप्पा होता पुणे-ते दिवेघाट तेव्हा ना मोबाइल होता ना कॅमेरा त्यामुळे ती पाहिलेली आणि अनुभवलेली वारी फक्त डोळ्यात साठवून बरेच अनुभव गाठीशी घेऊन ओल्या डोळ्यांनी घरचा रस्ता गाठला. तो दरवर्षी जमेल तितकी वारी करेल. त्याच्या नंतरच्या वर्षी मित्राच्या कृपेने ५००D आणि मागचं ब्लर करणारी लेन्स घेऊन वारीचा रस्ता पकडला. गाडी वगैरे पार्क करून त्या वैष्णवांच्या मेळ्यांत शिरलो समोर रंगबेरंगी लुगडी - साडी परिधा

Trek to Songiri Fort

Image
किल्ले सोनगिरी ...  अप्पा ने  जेव्हा  किल्ले सोंडई चा ट्रेक तयार केला तो पर्यंत किल्ले सोंडई आणि किल्ले सोनगिरी या किल्ल्या बाबत काहीच माहिती नव्हती . एफबी  वरून जेव्हा हा ट्रेक  टाकण्यात आला होता त्यावेळी खूप मुलांनी गोइंग म्हंटले होते ,  त्यामुळे मनामध्ये बरयाच लोकांबरोबर हा ट्रेक करता येईल असं वाटलं होतं , पण प्रत्यक्षात शिवाजी नगर स्थानकावर सकाळी ५. ३० आल्यावर मी धरून ४ ट्रेकर आले होते व २ ट्रेकर मुंबईहून निघाले होते ते आम्हाला कर्जत स्थानकावर  येउन मिळणार होते . आम्ही ट्रेन ने  सुरूवात केली ट्रेन मधून लोणावळा , खोपोली , या परिसराच सौंदर्य पाहून मन उत्साहित झाले होते , त्यात नीला शुभ्र आकाश दिसत होता पावसाचा  लवशेश  हि नव्हता , त्यामुळे  मनात खूप फोटो काढू हे ठरवूनच टाकला होता , रेल्वे प्रवासात ओळखी व अनुभव सांगण्यात सुरवात झाली त्यामुळे स्टेशन ला केव्हा पोचलो हे लक्षात आलच नाही. आम्ही कर्जत स्थानका वर उतरून मुंबई हून येणाऱ्या मित्राची वाट पाहत होतो , ते येउन मिळाले मग आम्ही किल्ले सोन्ड्यी कडे मार्गस्त झालो नष्ट उरकून आम्ही किल्ल्याकडे निघालो , कर्जत बाजारात आल्यावर सोन्ड्यी कडे

Camping & trek to Ghanagad Fort...

Image
Camping & trek to Ghanagad Fort...   आदल्या दिवशी साने चा घनगड ट्रेक साठी कॉल आला आणि मी औपचारिकता म्हणून येतो बोलून निरोप घेतला. अगदी ट्रेक च्या मीटिंग पॉईंट पर्यंत जाऊ का नको अश्या द्विधा मनस्थितीत मी होतो इकडे whatsapp  ग्रुप ला ट्रेक च नियोजन आणि खलबत रंगले होते पण शेवटी अंगातल्या आळसावर मात करून bike ला self देऊन निघालोच काही मित्र कार (परी ) ने निघाले होते तर काही NDA गेट ला माझी वाट बघत थाबंले होते. ते पुढे जाऊन भूगाव ला थांबतो बोलले आणि मी तिथे पर्यंत  यावे असं ठरले.  एकदाचे आम्ही भेटलो आणि मग सुसाट सुटलो अगदी मायकल शूमाकर ला हि लाजवेल इतकी सुसाट BIKE  भाग्येश चालवत होता पुढे असच चालवून आम्ही आमचं मीटिंग  पॉईंट अर्थात आमची बाकीचे मित्र पौड च्या पुढे थांबले होते. Meeting point तिथे थोडा पोटोबा करून आम्ही परत सुसाट निघालो कार (परी) चा थांबा अविनाश कडे होताच तर आमचा मायकल शूमाकर अर्थात भाग्येश त्याच्या BIKE चा ताबा घेऊन होता. मी कंटाळा आला म्हणून कार मध्ये जाऊन बसलो आणि गौरीला (कार मालक ) कार बाहेरचा रस्ता दाखवला आता आमच्या ताफ्यात एक कार आणि तीन BI

रतनगड - सांधण Valley एक स्वप्नपुर्ती…

Image
रतनगड - सांधन Valley.. पावसाळा नुकताच संपला होता थोड़ी वेगळी आणि निवांत भटकंती करू असा विचार असताना सर्वानुमते रतनगड आणि सांधन valley करू असा शिक्कामोर्तब झाला  बरेच दिवस plan करुण शेवटी ठरलेल्या दिवशी आम्ही निघालो भोसरीतुन विशाल सावंत गाड़ी घेऊन शिवाजीनगर ला आला होता त्याच्या बरोबर रोहन भोसले आणि अभी कदम होते मी पोचलो आणि काही वेळात स्वप्निलदादा नवले हे रविदा कोल्हे यांच्या बरोबर आले आम्ही  आता वाट पाहत होतो ते मुंबईतील आमच्या मित्रांची थोड्या वेळात राहुल कराळे (RK)हे त्यांच्या नविन रथासोबत दाखल झाले RK हे मुंबईतील मित्रांना आणायला स्टेशन वर गेले थोड्या वेळात मुंबई चे मित्र आलेच आम्ही भेटी गाठी करुण गाड़ी रतनगड कड़े मार्गस्थ केली ओतुर फाटयावरुण आम्ही जाणार होतो आमचे guide श्री काळू बांडे हे आमची त्यांच्या बहिणीच्या म्हणजेच शेंडी या गावी वाट पाहत होते  आम्ही गाडी सुरु होताच आम्ही ओळख कार्यक्रम करुण घेतला आणि मग झाली  गाण्यांची मैफिल सुरु शेर शायरी ,कविता तर मधेच जूनी गाणी आम्ही ओतुर फाटा ओलांडला आणि मग gps ची मदत घेत रात्री 4 वाजता आम्ही शेंडी या गावी पोचलो तिथे राहण्याची सोय आ