वारी सोहळा - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे पांडुरंगा आम्हांला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे.. या ओळी वाचल्या कि वारी सोहळ्याशी असणार भावनिक नातं सांगून जातं... शाळेत असताना वारी मुळे २-३ दिवस सुट्टी मिळायाची तेवढीच काय ती वारीची ओळख , घराजवळ २ दिवस चालणारे भजन, माउलींचा नामघोष परिसर उजळुन टाकायचे, कॉलेज ला असताना वारी जवळून पहायाचा योग जुळून आला तेव्हा काय तर मनात म्हणायचो काय हे वारकरी पोटापाण्याचा काम - धंदे सोडून वारी ला का? जातात, पुढे जाऊन वारीचा हा अनुभव स्वतः घ्यावा म्हणून ६-७ वर्षांपूर्वी पहिल्याचं वारीला गेलो होतो पहिला टप्पा होता पुणे-ते दिवेघाट तेव्हा ना मोबाइल होता ना कॅमेरा त्यामुळे ती पाहिलेली आणि अनुभवलेली वारी फक्त डोळ्यात साठवून बरेच अनुभव गाठीशी घेऊन ओल्या डोळ्यांनी घरचा रस्ता गाठला. तो दरवर्षी जमेल तितकी वारी करेल. त्याच्या नंतरच्या वर्षी मित्राच्या कृपेने ५००D आणि मागचं ब्लर करणारी लेन्स घेऊन वारीचा रस्ता पकडला. गाडी वगैरे पार्क करून त्या वैष्णवांच्या मेळ्यांत शिरलो समोर रंगबेरंगी लुगडी - साडी प...